Sanjay Raut | लोकसभेच्या जिंकलेल्या सर्व 18 जागा लढवणार आणि जिंकणार- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी याच पार्श्वभूमीवर मविआची बैठकही पार पडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आगामी लोकसभेत आमचे १९ खासदार लोकसभेत दिसतील, असा दावा केला आहे. तसचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टिकेवर राऊतांनी पलटवार केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत (What did Sanjay Raut say)

आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल अजून काही ठरलेला नाही. परंतु राज्यात महाविकास आघाडी आहे आणि राहील. लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. तसचं लोकसभेच्या जिंकलेल्या सर्व 18 जागा आम्ही लढवणार आणि जिंकणार देखील आहोत. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. याचप्रमाणे दादरा नगर हवेलीतील एक खासदार विजयी होईल. तर लोकसभेत आमचे 19 खासदार जातील असं देखील संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, काल (18 मे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामधील बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्या टीकेचा चांगलाच समाचार घेत संजय राऊत म्हणाले की, बेकायदेशीर सरकारचा पोपट मेला आहे. या सरकारला बेकायदेशीरपणे ऑक्सिजन दिलं जात आहे. लवकरात -लवकर बीएमसी निवडणूका घ्या..मग कळेल..जनता दाखवणार कोणाचा पोपट मेला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Wkp1rx