Sanjay Raut | विठोबा खोक्यांकडे आणि तेलंगणाच्या बोक्यांकडेही पाहतोय – संजय राऊत
Sanjay Raut | मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) काल पंढरपूरात होते. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर बीआरएस (BRS) पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसीआर यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. केसीआर यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचे हित बघावं, असं संजय राऊत म्हणाले.
KCR should pay attention to his state – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “केसीआर यांनी आपल्या राज्याकडं लक्ष घ्यावं. केसीआर यांच्या राज्यामध्ये भ्रष्टाचाराचे सगळ्यात जास्त प्रकरणं आहे. त्यांच्या मुलीवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ईडी त्यांची चौकशी करत आहे.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “विठोबा सगळीकडे पाहत आहे. विठोबा हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. पांडुरंग डोळे उघडे ठेवून सर्व घडामोडीकडे लक्ष देत आहे. विठोबा खोक्यांकडेही पाहत आहे आणि तेलंगणाच्या बोक्याकडेही पाहत आहे.”
“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं हित बघण्यासाठी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी येण्याची गरज नाही. इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आमच्या राज्यात हस्तक्षेप करू नये. केसीआर यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे हित बघावं”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | चंद्रशेखर बावनकुळे केसीआर यांची वकिली का करताय? – संजय राऊत
- Sharad Pawar | आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी! नवी दिल्लीत आज होणार NCP ची बैठक
- IND vs IRE | ‘या’ तारखेला भारतीय संघ जाणार आयर्लंड दौऱ्यावर
- Vijay Wadettiwar | सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू – विजय वडेट्टीवार
- Jayant Patil | जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पद सोडणार? ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधान
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3CR7WfW
Comments are closed.