Sanjay Raut | विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्षांसारखं वागावं; संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांना सुनावलं

Sanjay Raut | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (11 मे) महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) सुनावलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्षांसारखं वागावं, असं म्हणत संजय राऊत यांनी नार्वेकरांवर टीकास्त्र चालवलं आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहे. सत्ता संघर्षाचा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मुदत दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्षांसारखा वागावं. ते कायद्याच्या खुर्चीवर बसले आहेत. त्यामुळे त्यांनी अरे-तुरे आणि जर-तरची भाषा करू नये. त्याचबरोबर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळावे.”

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष अनेक पक्षांतर करून सध्याच्या पक्षात पोहोचले आहे. त्यामुळे पक्षांतराविषयी नार्वेकर यांना घृणा असेल, असं वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि निर्णय त्यांना मान्य करावा लागणार आहे.”

सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. “सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना अपात्र याचिकांवर निर्णय घेण्यासाठी चौकट आखून दिली आहे. त्या चौकटीनुसार त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांनी उलट-सुलट काही केलं तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ.”

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.