Sanjay Raut | विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवार का आहे गैरहजर? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut | मुंबई: आज बंगळुरू शहरामध्ये काँग्रेसने दुसरी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षांची पहिली बैठक बिहारच्या पाटणा शहरात पार पडली होती. तर आज आणि उद्या (17 जुलै आणि 18 जुलै) दुसरी विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीला जवळपास 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) या बैठकीच्या पहिल्या दिवशी गैरहजर राहणार आहेत. याबाबत ठाकरे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar is the main face of the opposition alliance
माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शरद पवार यांच्या विषयी कालपासून एक संभ्रमाचं वृत्त पसरतं आहे की ते बंगळूर येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. या बातमीवर माझा अजिबात विश्वास नव्हता.
कारण विरोधी आघाडीतील प्रमुख चेहरा शरद पवार आहे. त्यामुळं आज सकाळी मी फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा मला शरद पवारांनी सांगितलं की, आज या बैठकीमध्ये विशेष कामाचा अजेंडा दिसत नाहीये.
परंतु उद्या सकाळी ते या बैठकीला उपस्थित असतील. महाराष्ट्रातून दोन प्रमुख नेते या बैठकीला हजर असणार आहेत. ते म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “जागा वाटपाचे सूत्र काय असतील? यावर या बैठकीत चर्चा नक्की होईल. देशातील जनतेच्या लोकांच्या शंकांवर या बैठकीत चर्चा होईल. त्याचबरोबर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत बोललं जाणार आहे.
उद्या विरोधी पक्षातील लोक एकत्र आले तर त्यांच्यावर ईडीची कारवाई केली जाते आणि विरोधकांची आघाडी तोडण्याचा प्रयत्न केला जातो. पण तरीही आम्ही ठामपणे एकत्र राहणार आहोत.”
दरम्यान, शरद पवार आज बंगळुरूला न जाता मुंबईमध्येच थांबणार आहे. मुंबईमध्ये शरद पवार आज आपल्या आमदारांची भेट घेणार आहे. शरद पवार गटाच्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष (Sanjay Raut) लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Bacchu Kadu | “बच्चू कडूंना मंत्रिपद…”; मुख्यमंत्री शिंदेंना कार्यकर्त्यानं लिहिलं रक्तानं पत्र
- Rohit Pawar | धक्कादायक! पुण्यातील रोहित पवारांचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
- Sharad Pawar | विरोधी पक्षाच्या बैठकीला शरद पवारांची अनुपस्थिती, अचानक का केला दौरा रद्द?
- Gatari Amavasya | भाजपतर्फे गटारीनिमित्त मोफत कोंबडी वाटप! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात पुन्हा येणार मोठा भूकंप? अजित पवारांनी मारला डोळा
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3XYlf7V
Comments are closed.