Sanjay Raut | “शिंदे गटात गेलेले सगळे दलाल, सगळी झुंड आमच्या दारात…”; राऊतांची सडकून टीका

Sanjay Raut | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली  आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. मात्र असं असतानाही उद्धव ठाकरे गटातून एकेकजण शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. याच पार्वश्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या ११ नगरसेवकांना सुनावलं आहे.

ठाकरे गटाच्या ११ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा पार पडला असून त्याकरिता पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांचीही उपस्थिती यावेळी होती. याच प्रवेशावर संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेले सर्व दलाल असल्याचे म्हंटले आहे.

महाराष्ट्रातून जी काही लोकं शिंदे गटात सामील झाली आहेत, एकतर ती दलाल आहेत. दोन नंबरचे त्यांचे धंदे आहेत. तसेच लालच दाखवून त्यांच्यावर दबाव आणून प्रवेश केले जात असल्याचे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. या सगळ्यांचे दारु, जुगार, मटका असे धंदे आहेत. बनावट दारुचा व्यवसाय करणारे काही लोक आहेत. त्यांना कोणत्या पक्षाशी निष्ठा नसल्याचे राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “जे लोक तिकडे गेले त्याचे आम्हा दु:ख नाही. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी ही सगळीच्या सगळी झुंड परत आमच्या दारात उभी राहीलेली दिसेल. फक्त त्यांच्या गळ्यातील दुपट्टे बदलतील.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.