Sanjay Raut | शिंदे गटाला अजितदादांची धुणीभांडी करावी लागणार – संजय राऊत
Sanjay Raut | नाशिक: काल (14 जुलै) अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेत्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांना अर्थ खात मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. सध्या शिंदे गटातील लोक आनंदानं टाळ्या वाजवत आहे. मात्र, त्यांना अजित पवारांची धुणीभांडी करावी लागणार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीला गेले होते. मात्र, दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंचं काहीच ऐकून घेण्यात आलेलं नाही.
अजित पवारांना अर्थ खात द्यायचं नसेल तर अर्थ खात तुमच्याकडे ठेवा. मात्र, तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असं शिंदेंना दिल्ली दरबारात सांगण्यात आलं होतं. या प्रस्तावामुळे शिंदे गटानं माघार घेतला आहे. ही माझी पक्की माहिती आहे आणि माझी माहिती नेहमी पक्की असते.”
The Shinde group can do nothing but applaud – Sanjay Raut
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “एकनाथ शिंदे सक्षम नेतृत्व आहे की नाही? हा प्रश्नच नाहीये. कारण त्यांच्याकडं आता दुसरा उपाय नाहीये. शिंदे गटाला आता अजितदादांची धुणीभांडी करावी लागणार आहे.
अजित पवार सत्तेत सामील झाल्यानं ही लोक आनंदानं टाळ्या वाजवत आहे. कारण ही त्यांची मजबुरी आहे. टाळ्या वाजवण्याशिवाय ते दुसरं काहीच करू शकत नाही.”
“अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आम्हाला अजिबात पटलेला नाही. त्याचबरोबर तो निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा नाही.
शिवसेना फोडण्यापुरत शिंदे गटाच्या नेत्यांचं महत्त्व आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचं महत्त्व संपलं आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | मी जाहिरातबाजी करणारा नेता नाही; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
- Aditya Thackeray | ना खाती, ना इज्जत, गद्दारांना काय मिळालं? शिंदे गटावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
- Ajit Pawar | नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला देशात कुठेच पाहायला मिळणार नाही – अजित पवार
- Ajit Pawar | शरद पवारांना पुन्हा एक धक्का! पवारांचा आणखीन एक शिलेदार अजित पवार गटात सामील
- Sanjay Raut | लोकप्रिय नेत्यांच्या सभांसाठी माणसं जबरदस्तीनं आणली जातात; संजय राऊतांची राज्य सरकारवर खोचक टीका
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Oht4m9
Comments are closed.