Sanjay Raut | शिंदे-फडणवीस सरकारनं भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: ‘कलंक’ या शब्दावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर या शब्दावरून टीका केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस आणि भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारनं भ्रष्टाचारला संरक्षण दिलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

The government has protected corruption – Sanjay Raut

माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, “अजित पवार गट राज्य सरकारमध्ये दोन गोष्टींसाठी सामील झाला आहे. एक म्हणजे ईडी कारवाई दाबण्यासाठी आणि आणि दुसरी म्हणजे बंगल्यांसाठी. सरकारनं भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं आहे. हा महाराष्ट्राला लावलेला कलंकच आहे.

जो महाराष्ट्राला कलंक लावत आहे, त्याला आपण कलंकीतच म्हणणार. भ्रष्टाचाराला संरक्षण देणारे सरकारमध्ये आणि दाऊदमध्ये फरक काय आहे? हे सरकार एक प्रकारची गॅंगच आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी कलंकित केला त्याला उद्धव ठाकरे यांनी कलंक म्हटलं आहे. कलंक शब्दावर काही बंदी नाही. देवेंद्र फडणवीस यांना हल्ली लवकर मिरच्या झोंबतात. ही त्यांची निराशा आहे. कारण कालचा मुख्यमंत्री आज भ्रष्टाचाऱ्यांबरोबर बसतो. ज्यांना ते जेलमध्ये पाठवणार होते आज त्यांना त्यांच्या बाजूला बसावं लागत आहे.”

“देवेंद्र फडणवीस यांना आम्ही प्रश्न विचारतो, तेव्हा ते चिडतात आणि अस्वस्थ होतात. त्यांना काही विचारल्यानंतर त्यांच्या मनाचा उद्रेक होतो. त्यानंतर ते वेडी-वाकडी विधान करतात. मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे.

काही लोकांना निवडणुकीपूर्वी तुरुंगाच्या बाहेर काढण्याचं षडयंत्र सध्या रचलं जात आहे. याबाबत मी तुम्हाला लवकरच पुरावे देईल”, असही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Obp6LO