Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही”; संजय राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut | मुंबई : भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आज महामोर्चाचं आयोजन केलं आहे. यावेळी आयोजित सभेत बोलताना संजय राऊतांनी मोठं विधान केलं आहे. या मोर्चाच्या माध्यमातून आता रणनीती ठरली. रणशिंग फुंकले आहे आणि शंखही फुंकला आहे. आता ही फौज युद्धासाठी सज्ज झाली असल्याचंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.

ते म्हणाले, “आजच्या महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदच्युत केलं आहे. राज्यपालांना पदच्युत करणारा हा विराट मोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा इशारा या मोर्चाने दिला आहे.”

“महापुरुषांचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकेल का? यांना एक मिनिट सुद्धा सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार उलथवून टाकण्याचा हा दिलेला हा इशारा आहे. आज दिल्लीही दुर्बिणीतून पाहत असेल महाराष्ट्राची ताकद काय आहे. महाराष्ट्राची शक्ती काय आहे. आज महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्र पेटलाय, ही ठिणगी पडली आहे”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

पुढे ते  म्हणाले, “या व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रत्येक नेता आहे अन् महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले आहेत. हा सर्वात मोठा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे सरकार उलथवून टाकण्याची संधी आम्हाला कधी मिळतेय याची महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनता वाट पाहत आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.