Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकार 3 महिन्यात कोसळणार” ; संजय राऊतांची भविष्यवाणी

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सत्ता संघर्षाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार तीन महिन्यात कोसळणार अशी भविष्यवाणी संजय राऊत यांनी यावेळी केली.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत संजय राऊत म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार तीन महिन्यात कोसळणार आहे. कारण हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आधी 16 आमदारांना घरी जावं लागणार आहे. त्यानंतर 24 आमदारही घरीच बसणार आहे. या सरकारचा अंत जवळ आला आहे. बेकायदा सरकारचा मृत्यू अटळ आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “काल कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्लज्जपणाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या चुका दाखवल्या आहेत, आमच्या नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सरकारचे नियम पाळू नये.”

“राहुल नार्वेकरांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहे. विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्यांमध्ये सत्ता संघर्षाचा निर्णय द्यावा लागणार आहे”, असं देखील संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

You might also like