Sanjay Raut | “शिंदे सरकारचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडलंय”; संजय राऊत यांचा घणाघात 

Sanjay Raut | मुंबई : भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आज महामोर्चाचं आयोजन केलं आहे. हा मोर्चा भायखळा येथून असून या मोर्चात तब्बल दोन लाख लोक सहभागी होणार आहेत. या मोर्चाला निघण्यापूर्वी संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “आजच्या मोर्चातून घणाघात तर बसेलच. पण घणाघात होणार आहे या कल्पनेने सरकारचे पाय लटपटू लागले आहेत. मोर्चाला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ केली गेली. 13 अटी शर्ती लादल्या. महापुरुषांचा अवमान सातत्याने होत आहे. त्याविरोधात हा मोर्चा आहे.”

हा महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा आहे. तुम्ही त्याला अटी घालता? हे बोलू नका. ते बोलू नका सांगता. हे करू नका. ते करू नका सांगता. आता भाषणही तुम्हीच लिहून द्या. जसं मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून देता तसं विरोधी पक्षाला लिहून द्या. काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. हे अटीत आहे. पण आमचा कुणी आमचा आवाज दाबू शकणार नाही, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलाय.

“सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी असतील तर त्यांनी मोर्चात सामील व्हावं. शिंदे सरकारचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडलं गेलं आहे. त्यामुळेच ते महापुरुषांचा अवमान सहन करत आहेत”, असा घणाघात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तुम्ही लाचार आहात. मिंधे आहात म्हणून तुम्ही महापुरुषांचा अपमान सहन करत आहात. तुम्ही फक्त खोकी मोजत बसा. आम्ही अपमानाविरोधात लढत आहोत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.