Sanjay Raut | “शिवसेना या आगीशी खेळू नका”, संजय राऊत यांचा इशारा

Sanjay Raut | नाशिक: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. त्याचबरोबर त्यांनी या दौऱ्यावर शिंदे गटावर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नाही. शिंदे गटातील परत कुणीच निवडून येणार नाही, असं ते या दौऱ्यादरम्यान म्हणाले आहे. मुंबई नाशिक आणि ठाणे सुद्धा शिवसेनेचेच आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडणुका झाल्या तर तिथे शिवसेनेचीच सत्ता येणार. आम्हाला पुन्हा जेलमध्ये टाकायचे प्रयत्न होत आहेत, अशी शंका देखील संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

शिंदे गटातील कुणीही परत निवडून येणार नाही. हे सरकार जाईल तेव्हा तुम्हाला तुरुंगात जावे लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. ही निष्ठावंतांची शिवसेना आहे. गद्दारांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी बाळासाहेबांचा जुना किस्सा सांगितला.

शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे ठिणगी आहेत. उद्धव ठाकरे संघ जपण्यासाठी खूप संघर्ष करत आहेत. ते आजारी असताना पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

आम्ही याचा सूट घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना ही एक आग आहे. या आगीसोबत खेळू नका. शिवसेना पवित्र आहे. आग पाणी आणि शिवसेनेसोबत खेळू नये. आम्ही इतिहास घडवणारी लोक आहोत आणि तुम्ही बेईमान लोक आहात. तुम्ही कसली क्रांती केली आहे? उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहून जनता आता क्रांती घडवून आणेल, असं देखील ते यावेळी म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.