Sanjay Raut | संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप; म्हणाले…
Sanjay Raut | मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर आज जळगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पाचोरा या ठिकाणी सभा होणार आहे. यापूर्वी च राऊतांनी गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
कोरोनाच्या नावाने जळगाव जिल्ह्यात तब्बल 400 कोटींचा घोटाळा : संजय राऊत (400 crore scam in Jalgaon district in the name of Corona: Sanjay Raut)
खासदार संजय राऊत म्हणाले की, “माझ्याकडे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे कागदपत्र आहेत. कोरोना काळात पालकमंत्री म्हणून आणि जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख म्हणून गुलाबराव पाटील यांनी चढ्या भावाने बेफाम खरेदी केली. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध यांचा समावेश आहे. 2 लाख रुपयांच्या व्हेंटिलेटरची खरेदी 15 लाखात करण्यात आली. आपल्या जिल्ह्यातील रुग्णांचे जीव वाचवण्यापेक्षा गुलाबराव पाटील हे प्रत्येकावर दबाव आणून खरेदी करुन घेत होते.” तसचं त्यांनी फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
दरम्यान, याआधी देखील पुरावे मी फडणवीस यांच्याकडे पाठवली आहेत परंतु अनेक प्रकरण त्यांनी दाबली. “मी गृहमंत्री झाल्याने काही लोकांच्या अडचणी वाढल्या असल्याचं फडणवीस म्हणत असतील तर त्यांचा हा गैरसमज आहे. कारण फडणवीस गृहमंत्री झाल्याने भ्रष्टाचारी, लफंगे, लुटमारी करणारे खुश झाले आहेत. आपला बाप आला असं त्यांना वाटतंय. शेतकऱ्यांचे पैसे कसे लुटले याबाबत पुरावे दिले. पण गृहमंत्र्यांनी काय केलं, त्यांना कोण घाबरत आहे. आता गुलाबराव पाटील यांचे प्रकरण पाठवत आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांवर गुलाबराव पाटील आणि देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Supriya Sule | “दगडफेक करणं महाराष्ट्राचे संस्कार नाहीत”; सुप्रिया सुळेंचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल
- Coronavirus Update । कोरोना रुग्णसंख्येत वाढ ‘या’ जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्या; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची सूचना
- Radhakrishna Vikhe Patil । “देवेंद्र फडणवीसचं आमच्या मनातील मुख्यमंत्री” : राधाकृष्ण विखे पाटील
- UPSC Recruitment | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू
- BARC Recruitment | भाभा अनु संशोधन केंद्रात नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
Comments are closed.