Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणी वाढणार!, ईडीने बजावली नोटीस अन् दिला ‘हा’ आदेश

Sanjay Raut | मुंबई : काही दिवसांपुर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाला आहे. अशातच राऊत यांच्या पुन्हा अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडी (ED) कडून संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आला असून चौकशीला हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

18 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहा, असं समन्स ईडीने संजय राऊत यांना बजावला आहे. ईडीने संजय राऊतांच्या जामिनाविरोधात सुधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. संजय राऊत यांचा जामिन रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सुधारित याचिका दाखल करण्याचे निर्देश ईडीला दिले होते. या याचिकेवर 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

राऊत यांची अटक ही बेकायदा असल्याचं सुनावणीमध्ये म्हटलं होतं. मुख्य आरोपी असलेल्या राकेश सारंग, एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी अधिकाऱ्यांना ईडीने अटक केली नाही, ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचं परखड मतही न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन देताना मांडलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.