Sanjay Raut | “संजय राऊतांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही”; कोणी दिला इशारा?
Sanjay Raut | मुंबंई : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात सीमाप्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यांमधील नेतेमंडळींकडून यासंदर्भात आक्रमक विधानं केली जात आहेत. या संदर्भात माध्यांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.
“रोज उठून बोम्मई महाराष्ट्राच्या कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर बोलताना शिंदे गटाचे नेते संतोष बांगर (Santosh Bangar) यांची जीभ घसरली.
“संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा आहेत”, असं संतोष बांगर म्हणाले आहेत. “संजय राऊत यांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही”, असा इशाराही संतोष बांगर यांनी दिलाय. पुढे ते म्हणाले, “आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही.”
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेलाही संतोष बांगर यांनी उत्तर दिलंय. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि मुख्यमंत्री शिंदे यांना एका खोलीत बंद करा. मग कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा निघेल,” अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. यावर बांगर म्हणाले, विरोधीपक्षातील नेत्यांना काही कामं उरली नाहीत. त्यामुळे ते अशी टीका करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Pathaan Controversy | संत परमहंस आचार्य यांनी दिली शाहरुखला धमकी, म्हणाले…
- Ajit Pawar | डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करा ; अजित पवार यांची विधानसभेत मागणी
- Nana Patole | “खोटारडेपणा आणि चेष्टा हा भाजपाचा खरा चेहरा”; नाना पटोलेंची सडकून टीका
- Auto Award 2022 | बजाजच्या ‘या’ बाईकला मिळाला बाईक ऑफ द इयर पुरस्कार
- Nitesh Rane | तुम्ही ग्रामपंचायतीत उभे रहा मग बघू हवा कशी निघते ; नितेश राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला
Comments are closed.