Sanjay Raut | संजय राऊतांना एकनाथ शिंदेंच्या द्वेषाचा कावीळ ; शिंदे गटाची खोचक टीका
Sanjay Raut | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. मात्र असं असतानाही उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश जोरात प्रवेश सुरु आहेत. नाशिकच्या ११ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. संजय राऊत यांनी या नगरसेवकांवर खोचक टीका केली आहे.
महाराष्ट्रातून जी लोकं शिंदे गटात सामील झाली आहेत, एकतर ती दलाल आहेत. दोन नंबरचे त्यांचे धंदे आहेत. तसेच लालच दाखवून त्यांच्यावर दबाव आणून प्रवेश केले जात असल्याचे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. या सगळ्यांचे दारु, जुगार, मटका असे धंदे आहेत. बनावट दारुचा व्यवसाय करणारे काही लोक आहेत. त्यांना कोणत्या पक्षाशी निष्ठा नसल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या या टीकेवर शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी जोरदार टीका केली आहे.
शितल म्हात्रे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील महाज्ञानी माननीय संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार आहेत. त्यांनी रेडे, प्रेत अगदी महिला आमदारांना वेश्या इथपर्यंत म्हटलं. गद्दार तर म्हणतच होते. आज त्यांना नवीन शब्द सुचले आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये नाशिक मधले नगरसेवक यांनी प्रवेश केला आणि एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर त्यांना काळे धंदे करणारे, दलाल, जुगार खेळणारे अश्या अनेक नावाने संबोधलेलं आहे. आमदार, नगरसेवक जेव्हा तुमच्याकडे असतात. तेव्हा ते धुतल्या तांदळाचे असतात का तसेच संजय राऊतांना एकनाथ शिंदेच्या द्वेषाची इतकी कावीळ झालेली आहे का ?”
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | संजय राऊतांनी शिक्षणासाठी रामभाऊ म्हाळगीत जावे ; आशिष शेलारांचा टोला
- Eknath Shinde | “सिल्वर ओकचे तुम्ही दलाल”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा पलटवार
- Skin Care Tips | चेहऱ्यावर ‘या’ पद्धतीने कोरफड लावल्याने होतील अनेक समस्या दूर
- Sanjay Raut | “शिंदे गटात गेलेले सगळे दलाल, सगळी झुंड आमच्या दारात…”; राऊतांची सडकून टीका
- BJP | “भाजपाकडून भुंकण्यासाठी श्वानपथक नियुक्त, त्यांचा रिमोट…” ; कोणी केली टीका?
Comments are closed.