Sanjay Raut | संजय राऊतांनी ठरवलं असतं तर अजितदादा 2019 ला मुख्यमंत्री झाले असते – अनिल पाटील

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी बॅनर दिसले आहे. यामधील काही बॅनरवर त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया देत असताना संजय राऊत यांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर अनिल पाटील (Anil Patil) यांनी उत्तर दिलं आहे.

अनिल पाटील म्हणाले, “संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या आहे. मात्र, संजय राऊत आणि ठरवलं असतं तर अजित पवार 2019 मध्येच मुख्यमंत्री झाले असते.

त्यामुळे आता बोलून काही उपयोग नाही. जेव्हा त्यांच्या हातात होतं तेव्हाच त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केलं असतं तर बरं झालं असतं.”

Ajit Pawar will soon become the Chief Minister of Maharashtra – Sanjay Raut

दरम्यान, काल (21 जुलै) माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं होते. ते म्हणाले, “अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे आणि हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो.

कारण मलाही राजकारण कळतं काय घडामोडी घडत आहे त्या कळतात. यावरून अजित पवारांचं भविष्य लवकरात लवकर जवळ येत आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “ते लवकरच मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री म्हणून जर त्यांचे बॅनर लागले असतील तर ते सत्य आपण स्वीकारायला हवं.”

अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून ते मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चांना कधी पूर्णविराम मिळेल? याची सर्वजन वाट बघत आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44zLLHr