Sanjay Raut | संजय राऊत किरीट सोमय्यांविरोधात जाणार कोर्टात; म्हणाले “मिस्टर पोपटलाल…”

Sanjay Raut | मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना मिस्टर पोपटलाल असं म्हणत ट्वीट्द्वारे याबाबत माहिती दिली आहे

“किरीट सोमय्या उर्फ भाजपाचे पोपटलाल माझ्याविरोधात तथ्यहिन आरोप करत असून,शिवसेना नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. मी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली असून, मिस्टर पोपटलाल यांना लवकरच कायदेशीर नोटीस बजावणार आहे. सत्याचा लवकरच विजय होईल, जय महाराष्ट्र…!”, अशा आशयाचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

कोणत्याही पुराव्यांशिवाय चिखलफेक करणे हा एक उद्योग झाला आहे. कोर्टातचं लढणं हा आमच्या लोकांसमोर एकमेव पर्याय आहे. आम्ही तो लढा लढू, असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटलं.

महत्वाच्या बातम्या :