Sanjay Raut | संजय राऊत यांचं संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांना आवाहन, म्हणाले…
Sanjay Raut | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते तसेच शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि संभाजीराजे भोसले यांना आव्हान दिलं आहे.
यावेळी, छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे भोसले यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीने शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला आहे, उद्धव ठाकरे यांनी तर सरकारला अल्टिमेटम दिला आहे, भाजपकडून वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहे, त्यामुळे या सर्वांविरोधात सर्वांनी एकत्र यावं, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.
ज्यांना ज्यांना महाराजांवर श्रद्धा आहे. ज्यांना ज्यांना महाजांचा स्वाभिमान आहे, त्या सर्वांनी या अन्यायाविरोधात एकत्र यावं. महाराजांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाने एकत्र यावं. महाराजांची विटंबना करणाऱ्यांविरोधात एकत्र यावं, असं देखील राऊत म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राला कोण जागा देणार आहे का? मुंबईत आसाम भवनसाठी जागा मागण्यात येत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यात सर्वांना जागा हवी आहे. गुजरात उद्योगधंदे पळवत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहेत. राज्यातील सरकारला देशात खोके सरकार म्हणून मान्यता मिळाली आहे. खोके सरकारचं आणि आसामचं काय?, असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Abdul Sattar | “मी नाराज नाही…”, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण
- Uddhav Thackeray | “खोके सरकार जेंव्हापासुन खुर्चीवर बसलंय तेंव्हापासुन…”; उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर बोचरी टीका
- Uddhav Thackeray | “हा पक्ष आहे का चोरबाजार?”; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात
- Abdul Sattar | कृषिमंत्री अब्दुल सत्तार गुवाहाटीला का गेले नाही? स्वत: दिले स्पष्टीकरण
- Uddhav Thackeray | “देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा” ; उद्धव ठाकरे यांची आक्रमक टीका!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.