Sanjay Raut | संजय राऊत यांच्या विरोधात ईडीची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार!

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात ईडीची याचिका ऐकण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे. राऊतांचा जामीन रद्द व्हावा यासाठी ईडीकडून याचिका दाखल करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा (Patra Chawl Land Scam) प्रकरणात ईडीच्या विशेष कोर्टाने जामीन दिला आहे. तो जामीन रद्द करण्यासाठी ईडीकडून प्रयत्न केल्या जात आहेत.

न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यानंतर आता न्यायमूर्ती एम. एस कर्णिक यांनी राऊतांच्या जामीनाविरोधातील याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीला आता दुसऱ्या खंडपीठासमोर याचिका दाखल करावी लागणार आहे.

ईडीने स्वत:च्या मर्जीने आरोपी निवडले असल्याचे यापूर्वी हायकोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. ईडीने संजय राऊतांना कोणत्या कारणाने अटक केली? ईडीकडे कारणच दिसत नाही,  मुख्य आरोपी राकेश आणि सारंग वाधवान यांना मोकाट सोडलं आणि संजय आणि प्रवीण राऊत यांना अटक कशी केली?, असा सवालही हायकोर्टाने केला आहे.

हा वाद पूर्णपणे दिवाणी आहे, पण त्याला मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गुन्हा असं लेबल ईडीने लावलं, अशी लेबल लावून तुम्ही निष्पाप व्यक्तीला गुन्हेगार ठरवून तुम्ही तुरुंगात डांबू शकत नाही, अशा परिस्थितीत जे योग्य आहे तेच कोर्टाला करावं लागेल, मग तो समोर कोणीही असो, असं हायकोर्टाकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.