Sanjay Raut | नाशिक: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी कर्नाटक निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत यांच्यावर टीका करत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पात्रतेपेक्षा जास्त बोलू नये. संजय राऊत यांच्यावर काय बोलायचं? त्याचबरोबर भडोत्री माणसावर काय बोलणार.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “संजय राऊत यांची भविष्यवाणी कधीच खरी ठरली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. भविष्यामध्ये त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल? काय माहित? काही दिवसांनी संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसेल, अशा शब्दांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.
कर्नाटक निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. स्थानिक राज्याचे निवडणुकांचे विषय वेगवेगळे असतात. त्याची तुलना केंद्रासोबत करू नये.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्षांसारखं वागावं; संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांना सुनावलं
- Karanatka Election Result | कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पहिला विजय घोषित
- Karnataka Election Result | बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर, तर सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समिती पिछाडीवर
- Karnataka Election Result | कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा कल काँग्रेसच्या बाजूने, नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…
- Ajit Pawar | मविआ नेत्यांकडून अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप