Sanjay Raut | “सरकारच्या तोंडात कुणी बोळा कोंबलाय का?”; सीमाप्रश्नावरून राऊतांचा संतप्त सवाल

Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, “आपण वारंवार सांगता की भुजबळांसोबत आम्ही तुरुंगात होतो. अरे मग दाखवा ना तुम्ही लाठ्या खाल्ल्या होत्या ते. तो जोर, तो जोश दाखवा ना. आता तुम्ही सत्तेवर आहात. मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही या प्रश्नावर भूमिका घेत नसाल, तर तुम्ही मुख्यमंत्रीपदावर बसण्यास योग्य नाही.”

“तुम्ही इतर सगळ्या विषयांवर बोलताय. तुम्ही भूखंडाच्या संदर्भात झालेल्या आरोपांवर तासभर उत्तर देता. मग सीमाप्रश्नाबाबत बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री रोज आमचाच अपमान करतोय, तर तुम्ही बोलत का नाहीत? तुमची मजबुरी काय आहे. सरकारच्या तोंडात कुणी बोळा कोंबलाय का?”, असा संतप्त सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारला केला आहे.

“एक इंचही जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची गेल्या ७० वर्षांत कधी बाजूच्या राज्यांनी केली नव्हती”, असंही संजय राऊत (Sanjay Raut) यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.