Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला होता. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणीसांनी ठाकरेंचा उल्लेख ‘कलंकीचा कावीळ’ असा केला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं आहे.
The government in the state is tarnished – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सध्याचं राज्यातील सरकार कलंकित आहे आणि या कलंकीत सरकारमध्ये स्वच्छ, चारित्र्यवान देवेंद्र फडणवीस अंगाला हळद लावून बसले आहे. त्यांनी लावलेली हळद पिवळी नसून काळी आहे. कारण त्यांनी कलंकित हळद लावली आहे.
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “केवढे ते चारित्र्यवान लोकं नीतिमत्तेच्या गप्पा मारणारे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार (Ajit Pawar), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह अनेकांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या मोहिमा राबवल्या आहे आणि आज याच लोकांना सरकारमध्ये घेऊन बसले आहे. त्यामुळे त्यांनी सरकार आणि महाराष्ट्र दोन्हीही कलंकित केला आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “भारतीय जनता पक्षातील प्रमुख लोकांना मी टिळकांचं चरित्र वाचायला देणार आहे. लोकमान्य टिळकांचा संघर्ष, त्यांची लोकशाही विषयीची भूमिका या सगळ्या गोष्टी आधी सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. पुरस्कार देणाऱ्यांनीही आणि पुरस्कार घेणाऱ्यांनीही.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | महाराष्ट्राचे संपुर्ण सरकारच कलंकित – संजय राऊत
- Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना फोनवरून मिळाली जीवे-मारण्याची धमकी
- Nitesh Rane | नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! म्हणाले, मर्दानगीवर कलंक…
- Supriya Sule | “ना थका हूँ, ना हारा हूँ…”; सुप्रिया सुळेंचं ‘ते’ ट्वीट चर्चेत
- Sharad Pawar | “मी राजकारणात कुणाला शत्रू मानत नाही, मात्र…; शरद पवारांचं सूचक विधान
Original NEWS SOURCE – https://bit.ly/44qXOGP