Sanjay Raut | सरकार बदलेल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण करू ; संजय राऊत यांचा इशारा
Sanjay Raut | मुंबई : मुंबई पोलिसांच्या EOW टीमने INS विक्रांत विमानवाहू युद्धनौका वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना क्लीन चिट दिली आहे. यासोबतच टीमने या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्टही कोर्टात दाखल केला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला, ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्ध क्राउडफंडिंगद्वारे गोळा केलेल्या सुमारे ५७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. दरम्यान यावर शिवसेना खासदार संजय राऊत इशारा दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, “आम्ही त्याच्याकडे पाहत नाही. सरकार बदलल्यावर अशा अनेक गोष्टी अपेक्षित असतात. त्यातलीच ही एक गोष्ट आहे. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. विक्रांत संदर्भात पैसै गोळा झाले आहेत. हे सर्वांनी पाहिले आहे. मग तो एक रुपया असेल किंवा ५० कोटी असतील. पैशाचा अपहार हा झालेला आहे. पैसे राजभवनात गेले असे म्हणतात. मात्र राजभवन म्हणते पैसे आले नाहीत. हाच सर्वात मोठा पुरावा आहे. जरी आज सोमय्यांना क्लीन चिट मिळाली असेल. तर २०२४ ला हे प्रकरण समोर येणार नाही, असे नाही. सरकार बदलेल, कोणतेही सरकार कायमस्वरूपी नसते. सरकार बदलेल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल.”
दरम्यान पोलिसांच्या अहवालानुसार या प्रकरणाच्या तपासात कोणताही गुन्हा आढळून आलेला नाही. तसेच सोमय्या यांचा कोणाचीही फसवणूक करण्याचा हेतू नव्हता असे आढळून आले. या मोहिमेसाठी २,००० रुपयांची देणगी देणारे ५३ वर्षीय माजी सैनिक बन भीमराव यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Honda Electric Bike | होंडाची ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
- Walnut Water | अक्रोडाचे पाणी प्यायल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- Kane Williamson | कसोटी कर्णधार पदावरून विल्यमसनचा राजीनामा, कोण असेल न्युझीलंडचा नवा कर्णधार?
- Maharashtra Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
- Sushma Andhare | प्रेतयात्रा काढल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Comments are closed.