Sanjay Raut | हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा; संजय राऊतांचा शिंदे-राणेंना इशारा

Sanjay Raut | मुंबई : मुंबईतील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेतील भाषणातून खासदार संजय राऊतांनी ( Sanjay Raut) सत्ताधारी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी विरोध पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांना देखील आवाज देत अजित दादा येतील, बोलतील, आणि जिंकतील असं म्हटलं. तसचं हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा असं म्हणतं संजय राऊतांनी शिंदे-राणेंना इशारा देखील दिला आहे.

हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा: संजय राऊत (Whoever collides with us will be mixed in the soil: Sanjay Raut)

सुरुवात करत आपल्या महाराष्ट्राला प्रणाम करण्यासाठी ही वज्रमूठ सभा आहे असं म्हटलं आहे. तर या सभेने आज निकाल दिला आहे की, मुंबई महाराष्ट्राची, आमच्या बापाची आहे. म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंची आहे. अशा शब्दात वर्णन केलं. याचप्रमाणे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला. काल आले होते, आता आहेत का माहिती नाही, बहुतेक सभेत येऊन बसले असतील. पाहा ही ताकद, निष्ठा आणि वज्रमूठ पाहा. हम सब एक है अस म्हणतं राऊतांनी त्यांना डिवचलं आहे. तसचं अजित दादा येणार का या सभेला या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून दादा सभेला आलेत तुमच्या समोर बसले असं म्हणतं दादाचं सर्वांना फार आकर्षक असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक करत आदित्य ठाकरे आले, बोलले आणि सभेला जिंकून गेले. अस म्हटलं. तर मोदींवर जोरदार टीका करत देशात काल आणखी एक इव्हेंट झाला, मन की बात, गर्दीत माधुरी दिक्षित ऐकतेय. या देशाचा एकमेव पंतप्रधान मी पाहिला की, जो नऊ वर्ष मन की बात करतो काम की बात करत नाही. पण महाराष्ट्राची वज्रमूठ सभा काम की बात करेल. अशा शब्दांत टीका देखील केली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची, कमजोर करायची असं षडयंत्र रचलं जातंय. त्यासाठी शिवसेनेवर घाव केला. शिवसेना जोपर्यंत मजबूत आहे तोपर्यंत आपल्याला मुंबईवर घाव करता येणार नाही ही भीती दिल्लीश्वरांना आहे, पण शिवसेना पाय रोवून उभी राहिल, कारण मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर आहे. तुम्ही काहीही करा पण 2024 मध्ये महाराष्ट्रात हीच वज्रमूठ सत्तेत येईल. आम्ही जिंकणार आल्याचा दावा देखील त्यांनी आपल्या भाषणातून केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.