Sanjay Raut | गेल्या काही दिवसांपासून बारसु रिफायनरी प्रकल्प हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. बारसु मधील स्थानिकांनी आंदोलन करत हा प्रकल्प या ठिकाणी होऊ नये अशी मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील या प्रकारणावरून टीका टिप्पणी सुरू आहे. तर आज (6मे) उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) रत्नागिरी मधील बारसु दौऱ्यावर आहेत. यामुळे ठाकरेंच्या या दौऱ्यला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांनी विरोध करत म्हटलं उद्धव ठाकरेंना बारसूत येऊ देणार नाही. त्यांच्या या वक्तव्याला आता खासदार संजय राऊतांनी ( Sanjay Raut) पलटवार करत उत्तर दिलं आहे.
तुमच्या या पोकळ धमक्याना आम्ही घाबरत नाही : संजय राऊत
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, उद्धव ठाकरे हे बरसुतल्या स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. तिथल्या लोकांनावर सत्ताधारी सरकारकडून दबाव टाकला जातोय अशा वेळी तिथल्या लोकांचं म्हणणं समजून घेण्यासाठी ठाकरे बरसुमध्ये येणार आहेत. याचप्रमाणे पुढे बोलताना नारायण राणेंवर हल्लाबोल करत राऊत म्हणाले की, ‘राणे म्हणतात ना उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी येऊ देणार नाही म्हणजे काय? तुमच्या या पोकळ धमक्याना आम्ही घाबरत नाही त्या तुम्ही बंद करा’ अशा शब्दात राऊत यांनी हल्लबोल केला. तसचं उद्धव ठाकरे यांना रोखून तर दाखवाच, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे. जर अशा धमक्या कोणी देत असेल तर गृहमंत्र्यांनी त्यांना अटक कराव.
( Sanjay Raut Targeted On Narayan Rane)
दरम्यान, राऊत म्हणाले शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही. शिवसेना ही त्या ठिकाणच्या शेतकरी, कष्टकरी आहेत त्याच्या सोबत आहे. जेव्हा-जेव्हा कोकणावर आघात झाला. तेव्हा शिवसेना धावून गेली. जर राज्यात, देशात लोकशाही आहे तर कोणाचा काही संबध नाही शेतकऱ्याच्या हक्कावर आघात करण्याचा. तसचं अजूनही ठाकरे कुटुंबियांना त्या ठिकाणी जाण्यासाठी थांबवेल असा व्यक्ती जन्मला नाही. असं देखील संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- IPL 2023 | केएल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूची संघात एंट्री
- Sanjay Shirsat | …म्हणून शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम : संजय शिरसाट
- Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ
- Jitendra Awhad | शरद पवारांनी राजीनामा माघारी घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया ; म्हणाले …
- Ajit Pawar – अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले जोमाने काम करा