Sanjay Raut | हिंम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा; संजय राऊतांचं राज्य सरकारला खुलं आव्हान

Sanjay Raut | मुंबई: आज ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या या धडक मोर्चाला शिंदे-फडणवीस सरकारकडून सडेतोड उत्तर दिलं जाणार आहे. ‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय महायुतीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

This is a drama of Bharatiya Janata Party – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “भारतीय जनता पक्षाची ही एक नौटंकी आहे. विशेषतः मुंबईतली भारतीय जनता पार्टी. त्यांना कोणत्याही प्रकारची दिशा नाही. हिम्मत असेल तर त्यांनी निवडणुका घेऊन दाखवावं. म्हणजे शोर कोण माजवत आहे आणि चोर कोण आहे? हे कळेल. निवडणुका घ्यायच्या नाही लोकांना सामोरे जायचं नाही आणि मोर्चे काढून अशी नौटंकी करायची. ठाकरे गटाचा आजचा मोर्चा पाहून सत्ताधाऱ्यांच्या डोळ्याची बुबुळ बाहेर येणार आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “निवडणुका घेण्याची हिंमत तेच लोक करू शकतात, ज्यांना विजयाची खात्री आहे. आमच्यासारखे लोक निवडणुका घ्या, असं आव्हान करू शकतात. कारण आम्हाला माहिती आहे की जनता आमच्या पाठीशी आहे. ज्यांच्यावर खरोखर भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी होती, ते सगळे नग भाजप आणि शिंदे गटानं त्यांच्या पक्षात घेतले आहे.”

यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “गेल्या वर्षभरामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला? याच्या खोलात जावं लागेल.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PC5cdM