Sanjay Raut । भाजपच्या ‘या’ नेत्याचा बारमधील धिंगाणा करतानाच ‘तो’ व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला; म्हणाले..

Sanjay Raut । मुंबई : आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडणार आहे. तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांचा बारमधील व्हिडिओ शेअर सत्ताधाऱ्यांवर हिंदुत्वावरून चांगलाच निशाणा साधला आहे. तसचं यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुंबई पोलीस आयुक्त आणि नार्कोटिक्स ब्युरोला टॅग केला आहे.

संजय राऊत ट्विट करत काय म्हणतात (What Sanjay Raut Tweets Says )

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुंबई पोलीस आयुक्त आणि नार्कोटिक्स ब्युरोला टॅग करत म्हंटल आहे की, महाशय ! आपण काय कारवाई केली ते जनतेला कळू द्या. या ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपचे हिंदुत्व येथे काय करत होते ? असा सवाल करत सीसीटीव्ही फुटेज लगेच ताब्यात घ्या. खोक्यांचे राज्य हे अमली पदार्थांचे राज्य होऊ नये. जय महाराष्ट्र! असं ट्विट करत म्हंटल आहे. तसचं यांचं हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी फडणवीसांवर देखील निशाणा साधत म्हटलं की, व्हिडिओ शेयर करत राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत? बेशुद्ध अवस्थेत पहाटे तीन वाजेपर्यंत भाजप नेते मुलींसोबत नाचतात. बार बंद करायला गेलेल्या पोलिसांच्या वर्दीला हात लावतात. नक्की राज्याचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत. असा सवालही राऊतांनी विचारला आहे. तसचं लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.  तसचं “पहाटे 3.30 महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवट पर्यंत पहा.पोलिस हतबल आहेत..हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलिस आयुक्तांना पाठवत आहे.. मी वाट पाहतोय पोलिस काय कारवाई करत आहेत.. ” हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे. असं देखील ट्विट करत राऊतांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.