Sanjay Raut । “महाराष्ट्रात मोगलाई सुरू आहे का?” : संजय राऊत

Sanjay Raut । मुंबई : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नितीन देशमुख यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या 69 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात केली होती. यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यावरून आता वाद पेटला आहे. तर नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ही काय मोगलाई सुरू आहे का?

संजय राऊत म्हणले की, नितीन देशमुख हे त्यांच्या मतदार संघात पाणी येतंय ते खारं पाणी आहे. ते पाणी लहान मुलांना प्यायला द्यायचं का? त्याचसाठी नितीन देशमुख हे पायी यात्रा काढत होते. देवेंद्र फडणवीस यांना त्या पाण्याचे नमुने दाखविणार होते. मात्र, त्यावर आवाज उठवला तर त्यांना अटक केली? ही काय मोगलाई सुरू आहे का? अशा शब्दात सरकारला सवाल केला आहे. तसचं देवेंद्र फडणवीस यांनी मानसुकी दाखवायला हवी होती. परंतु त्यांच्या पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक करून त्यांना अज्ञात स्थळी लपवून ठेवले आहे. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, राऊतांनी माध्यमांशी बोलतांना खारघर प्रकरणावरुन सत्ताधारी सरकार वर चांगलाच हल्लाबोल केला आहे. साधू हत्या प्रकरणावेळी छाती बडवणारे आता कुठे गेले ? असा सवाल देखील उपस्थित केला. तसचं एकनाथ शिंदेंवर देखील हल्लाबोल केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बुच लावलं आहे का? ते बोलत का नाहीत ? असं संजय राऊत म्हणाले. या राऊतांच्या वक्तव्यामुळे आता वाद पेटू शकतो असं देखील म्हटलं जातं आहे. तर आमदार नितीन देशमुख यांना आंदोलन केलं म्हणून अटक केलं की यापाठीमागे देखील राजकीय खेळी आहे असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.