Sanjay Raut । “राज ठाकरे विश्वनेते” ; संजय राऊत यांची राज ठाकरेंवर टीका

Sanjay Raut । मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्या कोरोनकाळातील निर्णयाबाबत आणि कारभारावर टीका करत सवाल केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, कोरोनाच्या काळातही ढिसाळ नियोजन झालं होतं. त्यामुळे त्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

राज ठाकरे हे विश्वनेते आहेत : संजय राऊत (Raj Thackeray is a world leader : Sanjay Raut)

भाजपने काही पोपट पाळले आहेत. ते बोलत असतात. राज ठाकरे हे विश्वनेते आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. जे बोलतात त्यांना बोलू दया. पोपटपंची करू द्या. नोटबंदीच्या रांगेत हजारो लोक मेले हा सदोष मनुष्यवधच आहे ना. त्यावरही या भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा. गंगेत हजारो प्रेते वाहत आली. गुजरातला स्मशानात जागा नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागण राज ठाकरे यांनी करायला हवी. ते जगाचे नेते आहेत. ते ट्रम्पवरही बोलू शकतात, आता करा मागणी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, तसंच त्यांनी सध्या सीमेवर झालेल्या हल्ल्यावर देखील भाष्य केलं. जम्मू- कश्मीर मध्ये जे पाच जवान शाहिद झाले याबाबत मोदी सरकार यांनी दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे असं देखील राऊत म्हणाले. तर महाराष्ट्रात जे काही राजकारण चाललं आहे याबाबत बोलताना त्यांनी भाजपला देखील खडेबोल सुनावले आहेत. त्याबाबत राऊत म्हणाले की, काय मागण्या करता? कुणासाठी करता? खारघरला लोकं तडफडून मेले. बाजूला मेजवाण्या सुरु होत्या. पण लोकांना प्यायला पाणी नव्हते. त्यावर बोला. ढिसाळ नियोजनावर बोला. कशा करता सर्व कार्यक्रम केला त्यावर बोला. उठसूट उद्धव ठाकरे… उद्धव ठाकरे… सुरू आहे. झोपेतही उद्धव ठाकरे आणि जागेपणी उद्धव ठाकरेच सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.