Sanjay Raut । संजय राऊत यांना दिलासा नाहीच; दसऱ्यानंतर दिवाळीही तुरुंगातच

Sanjay Raut | मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांचा ईडी मधील मुक्काम संपला असून काही दिवसांपुर्वीच ते न्यायालयीन कोठडीत गेले आहेत. त्यांच्या जामीनसाठी त्यांनी अर्ज देखील आहे. मात्र, त्यांच्या सुनावणीची तारीख वारंवार पुढे ढकली जात आहे. अशातच पुन्हा त्यांच्या सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी झालेल्या सुनावणी दरम्यान 21 ऑक्टोंबरला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. ती सुनावणी आज पार पडली.

यानंतर आता राऊत यांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. पर्यायाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १५ दिवसांनी वाढला आहे. आज झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तवाद करायचा आहे, असं कोर्टाला सांगितलं. त्याची नोंद घेत कोर्टाने २ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे. कारण पुढचा आठवडा दिवाळीमुळे कोर्टाचं नियमित कामकाज बंद असेल.

दरम्यान, पत्रा चाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. पत्रा चाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून, अगदी सुरुवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात त्यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे. तसेच संजय राऊत यांचे बंधू प्रविण राऊत हे पत्राचाळ विकासाचे काम पाहत होते. त्यांना एचडीआयएल मिळालेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १.०६ कोटी रुपये हे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.