Sanjay Raut | “ज्याला कर नाही त्याला डर नाही, हक्कभंगाचे प्रकरण समोर आलं मी मांडलं”- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : राज्यातच नाही तर देशात ईडीने थैमान घातलं आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीकेचे बाण सोडत आहेत. यामुळे आता राज्यातच नाही तर देशात नेते लोकं एकमेकांवर टीका टिप्पण्यांचे ताशेरे ओढताना दिसतात. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल कुल यांनी मनी लॉडरींगच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच हक्कभंगाच्या प्रक्रियेत राहुल कुल आहेत. यामुळे राहुल यांचा कोणताही रोष नाही. तसेच संजय राऊत यांनी ट्वीट करत देखील भ्रष्टाचाराबद्दल माहिती दिली.

हक्कभंगाच्या कनेक्शनवर नेमकं काय म्हणाले संजय राऊत? Sanjay Raut

हक्कभंगाच्या कनेक्शनवर नेमकं काय म्हणाले संजय राऊत, हक्कभंगाच्या प्रकरणात राहुल कुल देखील होते. यावरून यांच्यावर आरोप करण्यात आलेत का? असा प्रश्न केल्यावर राऊत म्हणाले की, “कोणत्याही नोटीशीला घाबरत नाही. तसेच ज्याला कर नाही त्याला डर कशाला. भीती हा शब्द मला शिकवलेला नाही. बाळासाहेब ठाकरेंकडून बऱ्याच गोष्टी शिकलो, त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे निर्भयपणा. पक्षांतर केलं नाही, पाप केलं नाही. अशी अनेक प्रकरणं आहेत. ती शिवसेना – राष्ट्रवादीशी संबंध नाही. म्हणून ती सोमय्यांनी बाजूला ठेवली.”

Sanjay Raut Convey To Devendra Fadnavis About Curroption Issue 

राहुल कुल यांच्या भ्रष्टाचाराचे २००० पानांचे पुरावे संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवले. हे पुरावे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच का पाठवले? एकनाथ शिंदे म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडे का पाठवले नाहीत? असा सवाल केल्यानंतर राऊत म्हणाले की, “भ्रष्टाचारी सरकारला का पाठवू? त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा देखील सवाल केला आहे. अजूनही फडणवीसांकडून अपेक्षा आहे म्हणून त्यांच्याकडे पाठवलं”, असे संजय राऊत म्हणाले.

राऊतांचा फडणविसांवर पलटवार (sanjay Raut Replied To Fadnavis)

“तुम्ही भ्रष्टाचार करू नका असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. परंतु त्यानंतर देशात राज्यात प्रकरण कोण करतंय? त्यासाठीच हे प्रकरण काढलं आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने लाखो रुपये खर्च केले. परंतु हे गोळा केलेले पैसे राजभवनात गेले नाहीत. अशावेळी फडणवीस सरकार आल्याने त्यांनी हे प्रकरण क्लिनचीट केले. तुम्ही कोणत्या घोटाळ्याला पाठीशी घालता, तुम्हाला असं राज्य करायचा अधिकार नाही.”

महत्वाच्या बातम्या