Sanjay Raut | पीडितेचा फोटो व्हायरल करणं संजय राऊतांना भोवलं, ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Sanjay Raut | सोलापूर : सोलापूरातील बार्शी तालुक्यातील बाळेवाडी येथे ५ मार्च या दिवशी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणि नंतर तिच्या कुटुंबियांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यानंतरही मुलीवर उपचार सुरूच असून त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले आहेत. गुन्हेगारांनी कुटुंबियांवर हल्ला करून गुन्हेगारांचा अजूनही तपास नाही. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं. परंतु आता संजय राऊतांना हे प्रकरण चांगलंच अंगलट आलं आहे.

काय होतं प्रकरण? (What Is This Matter?)

सोलापूर येथे ५ मार्च या दिवशी एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. यावेळी पीडित मुलीने आरोपींविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर वेळीच पोलिसांनी त्यांना पकडलं नाही. त्यानंतर त्या आरोपींनी पुन्हा तिच्या घरात घुसून कुटुंबीय आणि पीडितेला ठाण्यात तक्रार केली म्हणून मारहाण केली.  त्याच मुलीवर अजूनही उपचार सुरुच आहेत. अशातच आता या घटनेला शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. एवढं सगळं होऊनही आरोपी अजूनही मोकाटच आहेत. सरकारची न्याय आणि सुव्यवस्था कुठे आहे. असा सावल त्यांनी ट्विट करत सरकारला केला आहे.

Sanjay Raut’s Tweet

“देवेंद्रजी हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजप पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.” असे ट्विट करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. याखाली पिडीतेचा फोटो देखील होता. यामुळे पिडीतेचा फोटो राऊतांनी समाजासमोर आणली. संजय राऊत आता अधिकच वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊतांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा गुन्हा लागू (Pocso Act On Sanjay Raut)

संजय राऊत यांनी बार्शीतील एका ठिकाणी झालेल्या बलात्काराबाबत सत्ताधारी पक्षाला लक्ष केलं. यातच त्यांनी पिडीत मुलीचा फोटो ट्वीट केला. यामुळे त्या मुलीची समाजात छबी प्रसारित केल्याचं म्हटलं गेलंय. यामुळे राऊतांवर बार्शी पोलिसांनी ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (pocso) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता संजय राऊत चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यामुळे आता राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या