Sanjay Raut | “मी कुठे म्हणतो माझा सल्ला ऐका”; संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. यावरुन अनेक नेते मंडळींनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘महाविकास आघाडीला तडा जाईल, असे वक्तव्य कोणी करू नये’, असे आवाहन देखील केले.

राऊतांच्या या आवाहनानंतर ‘हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मी विचार केला असता’, असे प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. प्रकाश आंबेडकरांच्या याच वक्तव्याला आता पुन्हा संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“माझा सल्ला मानावा असे मी म्हणालोच नाही. त्यांनी महाविकास आघाडीला तडा जाईल अशी विधाने करू नये, असे माझे म्हणणे आहे”  असे संजय राऊत म्हणाले आहेत.

“माझा सल्ला माना असे मी कुठे म्हणालो आहे. राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम होता. मी वंचित बहुजन आघाडी तसेच शिवसेनेच्या युतीबाबत बोललो नाही. मी महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केले. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहे. देशपातळीवर भाजपाच्या विरोधात आघाडी उभी करायची असेल, तर त्यात शरद पवार यांचा सहभाग आणि नेतृत्व महत्त्वाचे आहे असे मी म्हणतोय,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या