Sanjay Raut | “2024च्या विधानसभेला महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील”; राऊतांचा विश्वास

Sanjay Raut | पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. पण चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. महाविकास आघाडीने वंचित आघाडीचा पाठिंबा घेतला नाही. त्यानंतर वंचितने कलाटे यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचारही केला होता.

त्यामुळे राहुल कलाटे यांनी प्रचंड मते घेतली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला सुनावलं आहे. वंचित बहुजनला सोबत न घेतल्याने काय परिणाम होऊ शकतो, याचे खडेबोलच संंजय राऊत यांनी सांगितले आहेत.

Sanjay Raut React on Pune by Election Result

“कसबा आणि चिंचवडच्या निकालाने महाविकास आघाडीला धडे दिले आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोडं जरी इकडे तिकडे झालं एखादा बंडखोर.. एखादा घटक पक्ष बाजूला गेला तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी दिलेला हा धडा आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला सुनावलं आहे.

“विधानसभेला महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील”

“कसब्याचा निकाला हा भविष्यासाठी मार्गदर्शक आहे.  2024 निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजुटीने काम केलं तर विधानसभेला महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. आणि लोकसभेच्या किमाना 40 तरी जागा आम्ही जिंकू. वंचितला सोबत घेणं किती महत्त्वाचं आहे”, असाच अप्रत्यक्ष सल्लाही राऊत यांनी दिला आहे.

“चिंचवडमध्ये भाजपचा विजय कोणीच मानणार नाही”

“चिंचवडमध्ये आमच्या सर्वांकडून काही बाबतीत चूक झाली. चिंचवडमध्ये भाजपचा विजय झाला आहे हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्ष जगताप पॅटर्न चालतो. त्या जगताप पॅटर्नचा विजय आहे. उमेदवार निवडताना काळजी घेतली असती किंवा राहुल कलाटेंना माघार घेण्यास यश आलं असतं तर तिथेही नक्कीच वेगळा निकाल लागला असता”, असा दावा यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.