Sanjay Raut | 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 पर्यंत सुरु राहणार बार, संजय राऊतांचा आशिष शेलारांना सवाल

Sanjay Raut | मुंबई :  राज्यातील बार 24, 25 आणि 31 डिसेंबर या दिवशी पहाटे पाचपर्यंत सुरु राहणार आहेत. राज्य सरकारकडून याबाबत परिपत्रक देखील काढण्यात आले आहेत. तळीरामांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्याच्या महसूल विभागाच्या पत्रकाचा हवाला देत एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. मद्य प्रेमिंचा नवीन वर्ष सेलिब्रेशनचा उत्साह आणखी वाढणार आहे. या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मॉलमध्ये किंवा मोठ्या स्टोअरमध्ये वाईन विक्री देण्याचा निर्णय सरकार घेणार होते. तशी परवानगी देण्यात आली होती. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा होता. मात्र त्याला विरोध करण्यात आला. मद्य धोरणाला सरकार पाठींबा देते म्हणून विरोध करण्यात आला. आज तेव्हा विरोधात असलेले सरकार तो निर्णय घेऊन पुन्हा एकदा समोर येत आहे. नाईट लाईल ला विरोध करणारे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आता कुठे आहेत?. मुंबईतील भाजपच्या आमदारांनी आपली स्वतःची वक्तव्य काढून पाहावीत. हे दुतोंडी नाग आहेत. दोन्ही बाजूने वळवळतात.”

संजय राऊतांचा अण्णा हजारेंना सवाल –

संजय राऊत म्हणाले, “अण्णा हजारे यांनी ज्या भ्रष्ट्राचाराविरोधात रणशिंग फुंकले होते. त्यानंतर ते अचानक अदृश्य झाले. महाराष्ट्रात भ्रष्ट मार्गाने सरकार आले आहे. या भ्रष्ट सरकारविरोधात अन्ना हजारे यांनी जाब विचारल्याचे दिसत नाही. यामुळे लोकांच्या मनात शंका आहे. देशभरात अनेक राज्याचे सरकार भ्रष्टाचार करुन आपले सरकार टीकवत आहेत. आमदार विकत घेत आहेत. अण्णा हजारे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकपाल आणण्यासाठी आवाज उठवला होता. त्यांच्याकडे लोकांच्या अपेक्षा होत्या. लोकपालाच्या किंवा लोकायुक्ताच्या कक्षेतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी गुप्त रितीने होईल. पण गुप्त का? खुली चौकशी करा, तेव्हा पाणी का पाणी होईल.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.