मलिक व देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारल्यानंतर संजय राऊत संतापले, म्हणाले…

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाची परवानगी नाकारल्यानंतर या दोघांनी आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी 20 जून रोजी एक दिवसासाठी तुरुंगातून सोडण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती.

या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. विधानपरिषदसाठी मतदानाची परवानगी मिळवण्यासाठी मलिक आणि देशमुखांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांचा हा प्रयत्नही फसला आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांची विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मलिक देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारल्यानंतर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, देशातल्या संपूर्ण यंत्रणा कशा पद्धतीने काम करतायत, हे यानिमित्ताने दिसून आलंय. विधान परिषदेचे निवडून येणारे सदस्य हे विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. अशावेळी विधिमंडळ सदस्यांना जर मताचा अधिकार नाकारला जात असेल तर संसदीय लोकशाहीला टाळं लावा, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा