राज्यपालांना वाकून नमस्कार केल्यामुळे संजय राऊतांना करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणून खासदार संजय राऊत यांच्याकडे पाहिलं जातं. राऊत हे नेहमी या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असतात. आता आज देखील राऊत हे जरा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा होऊ नये, असे म्हणत आणि मला मूर्ख रामलाल या राज्यपालाची आठवण येते आहे, असे सांगत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज खुद्द राजभवनवर जाऊन कोश्यारी यांची भेट घेतली.

‘आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल’; संजय राऊत यांचा इशारा

या भेटीबाबत राऊतांनी स्पष्टीकरण दिले. ही सदिच्छा भेट होती. बरेच दिवस राज्यपालांशी भेट झाली नव्हती. त्यामुळे आज भेटलो, असे ते म्हणाले.राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, एखाद्या पिता-पुत्राने त्यांचे संबंधत आहेत, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत, असेही राऊत म्हणाले.

Loading...

या भेटीबाबत बोलताना राऊत म्हणाले,विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र सध्या देश, महाराष्ट्रात जे संकट आहे, अशावेळी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जाऊन थेट बातचीत करायला हवी, असे देखील राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.