“संजय राऊत, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा”

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी पावसामुळे कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या भागांचा दौरा केला. त्याचवेळी विदर्भातही अनेक ठिकाणी पूर आला होता. नुकसान झाले पण, मुख्यमंत्र्यांचा दौरा मात्र झाला नाही. यावरून नेहमी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करणाऱ्या संजय राऊत यांना बडनेराचे आमदार रवी राणा यांनी टोमणा मारला.

रवी राणा म्हणाले कि, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा! मुसळधार पावसामुळे विदर्भात खूप नुकसान झाले. अमरावतीत देखील अनेकांची घरे पडली. शेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकरी वाहून गेले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा दौरा केला नाही, अशी खंत रवी राणा यांनी व्यक्त केली.

अमरावतीच्या मेळघाट परिसरात गेल्या तीन महिन्यात कुपोषणामुळे ४९ बालकांचा बळी गेला आहे, तरी मुख्यमंत्र्याना या प्रश्नांवर लक्ष द्यायला वेळ नाही. महाराष्ट्रात पावसामुळे नुकसान झाल्याने राज्यपाल दौरे करत आहेत. तर संजय राऊत त्यांच्या दौऱ्यांवर टीका करत आहेत, अशी टीका रवी राणा यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा