Sanjay raut in ED custody | “संजय राऊतांना जबाब देण्यासाठी धमकावले जात आहे”; वकील मोहिते यांचा ईडीवर आरोप
मुंबई : महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) ताब्यात आहेत. त्यांची ईडी कोठडी आज संपणार होती त्यामुळे आज त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले. त्यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी देखील पार पडली असून कोर्टाकडून संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर यावेळी युक्तिवाद करताना राऊतांचे वकील मनोज मोहिते यांनी गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांना जबाब देण्यासाठी धमकावले जात आहे, असा आरोप त्यांनी ईडीवर केला आहे.
आज कोर्टात राऊतांची बाजू मांडत असताना मनोज मोहिते यांनी सांगितले कि, “संजय राऊतांना जबाब देण्यासाठी धमकावले जात आहे, त्यांच्यावर ईडीकडून दबाव टाकण्यात येत आहे.” तर आज राऊतांवर करण्यात आलेले आरोप हे जुनेच आहेत. त्याबाबतचे जबाब आधीच नोंदवून घेण्यात आले आहेत. तर मग अजून चौकशी आणि कोठडी कशासाठी?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. तसेच राऊतांवर झालेली कारवाई हि राजकीय द्वेषातून करण्यात आली असल्याचा पुनरोच्चार त्यांनी आजही केला. असाच आरोप मागच्या वेळी राऊतांचे जुने वकील अशोक मुंदरगी यांनी देखील केला होता. मात्र या सगळ्या युक्तिवादानंतरही कोर्टाने राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
स्वप्ना पाटकर यांचा आरोप
संजय राऊत हे आपल्याला धमकावत असल्याचा दावा स्वप्ना पाटकर आणि त्यांच्या वकिलांनी केला होता. त्यावर राऊत हे कोठडीत असल्यामुळे ते कसेकाय धमकवू शकतात, असा उलटप्रश्न कोर्टाने केला. त्यावर राऊत हे मोठे राजकीय वक्तिमत्व असून त्यांच्या सांगण्यावरून धमकावले जात आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
राऊतांच्या पत्नीच्या नावे संशयास्पद व्यवहार
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचे अनोळखी व्यक्तीशी व्यवहारिक संबंध आहेत. वर्षा राऊत यांच्या खात्यातून अनोळखी व्यक्तीशी मोठ्या रकमेची देवाणघेवाण करण्यात आली असल्याचे पुरावे मिळाले आहेत, असे ईडीने म्हटले आहे. तसेच संजय राऊत यांनी 10 प्लॉट खरेदी करण्यासाठी 3 कोटी रुपये रोख दिल्याची माहिती ईडी तपासात समोर आली होती. त्यामुळे या संदर्भातील तपास आणि चौकशी करण्यासाठी १० तारखेपर्यंत राऊतांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीने केली होती. त्यावर कोर्टाने १० तारखेपर्यंत कोठडी न देता ८ तारखेपर्यंत कोठडी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये ३ सामने होतील? जाणून घ्या सविस्तर…!
- Uday Samant | सर्वोच्च न्यायालयचा निकाल आमच्या बाजूनेच असेल – उदय सामंत
- sanjay raut in ED custody | संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
- Arvind Sawant | सरकारकडून सातत्याने कायद्याचं उल्लंघन होतंय – अरविंद सावंत
- Arvind Sawant | “कोर्टात लाॅजिक नाही फक्त कायदा चालतो”; कोर्टातील युक्तिवादावर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया
Comments are closed.