sanjay raut in ED custody | संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

मुंबई : महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) ताब्यात आहेत. तर आज त्यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी पार पडली आहे. त्यावेळी १० ऑगस्टपर्यंत त्यांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती. त्यावर कोर्टाकडून संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे अजून ४ दिवस ईडीकडून राऊतांची चौकशी सुरूच राहणार आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचे अनोळखी व्यक्तीशी व्यवहारिक संबंध आहेत. वर्षा राऊत यांच्या खात्यातून अनोळखी व्यक्तीशी मोठ्या रकमेची देवाणघेवाण करण्यात आली असल्याचे पुरावे मिळाले आहेत, असे ईडीने म्हटले आहे. तसेच संजय राऊत यांनी 10 प्लॉट खरेदी करण्यासाठी 3 कोटी रुपये रोख दिल्याची माहिती ईडी तपासात समोर आली होती. त्यामुळे या संदर्भातील तपास आणि चौकशी करण्यासाठी १० तारखेपर्यंत राऊतांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीने केली होती. त्यावर कोर्टाने १० तारखेपर्यंत कोठडी न देता ८ तारखेपर्यंत कोठडी दिली आहे.

राऊतांनीही केली तक्रार
यावेळी राऊतांनी ईडीची तक्रार करत काही गोष्टींचा खुलासा केला. “ईडीने मला ज्या खोलीत ठेवले आहे, तिथे व्यवस्थित व्हेंटिलेशन नाही”, अशी तक्रार त्यांनी कोर्टकडे केली. कोर्टाने या तक्रारीची दखल घेऊन ईडीला सुनावलं आहे. तर ईडीने या प्रकरणी लेखी माफी मागितली असून राऊतांना एसी रूम देणार असल्याचे सांगितले आहे. पण त्याबरोबरच संजय राऊत हे चौकशी दरम्यान समाधानकारक माहिती देत नाहीत, असा आरोप देखील ईडीने केला आहे.

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रंटमन’
पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यातून मिळालेले पैसे अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वळवण्यात आले आणि प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना रोख रक्कमही दिली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या रिमांड अहवालात म्हटले आहे. संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडून दरमहा लाखो रुपये मिळत असत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवीण राऊत यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे 1.06 कोटी रुपये वळवले. यासोबतच प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रंटमन’ असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.