संजय राऊतांना कमी-जास्त प्रतीचा गांजा कसा असतो ते चांगलं कळतं ! नितेश राणेंचा घणाघात

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. भाजपा, पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांवर उद्धव ठाकर यांनी जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतली व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच प्रमुख भाजपा नेत्यांकडून शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकासआघाडीवर जोरादार टीका सुरू झाली.

यानंतर शिवसेना प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना उद्देशून एक खळबळजनक विधान केलं आहे. महाराष्ट्रात किंवा देशात गांजाचं पीक जास्तच निर्माण झालं आहे, हे मला तर माहितीच नाही. काही लोक गांजा मारून काम करताना दिसत आहे. दसरा मेळव्यानंतर असला प्रकार मला वारंवार दिसतंय, विरोधी पक्ष बेतालपणे बोलतोय. या सर्वांची आता नार्कोटेस्ट केली पाहिजे.असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लागवला.

यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’असल्यामुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते. गांज्यावर इतके प्रेम बर नाही. अशी खोचक टीका नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये केली.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा