संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे.

मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा परतू नये असं म्हटलं होतं. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे? असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला आहे.

कंगनाच्या या ट्विटनंतर संजय राऊतांनी तिला धारेवर धरलं होतं. “जर महाराष्ट्रातील व्यक्ती हिमाचल प्रदेशमध्ये राहत असेल आणि ती व्यक्त जर असं म्हणत असेल की माझा शिमला पोलिसांवर विश्वास नाही. जर विश्वासच नाही, तर शिमलामध्ये राहू नको, असे संजय राऊतांनी सांगितले.

जर मला काही समस्या असेल तर त्यांना सांगेल. कुणीही व्यक्ती मुंबई पोलीस, राज्य सरकार यांच्याविषयी बोलते. हे बरोबर नाही. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आवाहन करतो की, जे लोक मुंबई पोलिसांविषयी वाईट बोलत आहेत आणि राज्यातील जे राजकीय पक्ष अशा व्यक्तींचं समर्थन करत आहेत, अशांविरुद्ध कारवाई करावी,” असं राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा