“संजय राऊत, तुम्ही मुंबईचे पोलीस आयुक्त कधीपासून झालात? ही धडपड कुणासाठी?”

मुंबई : साकीनाका येथे बलात्कार झालेल्या महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे. साकीनाक्याच्या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला असला तरी मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, असेही राऊत यांनी म्हटले होते.

राऊतांच्या या अग्रलेखावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. संजय राऊतांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील महिलांबाबतची असणाऱ्या तालिबानी प्रवृत्तीचं उदाहरण आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.

तसेच, मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरेंना विचारायचंय की, तुमचे कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेवा- दाव्यांसाठी करता आहात. अशा तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार?, असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे.

अहो संजय राऊत तुम्ही कधीपासून मुंबईचे पोलीस आयुक्त झालात, घटनेचा तपास पुर्ण होण्याच्या आधीच तुम्ही तुमच्या अग्रलेखात अत्याचार करणारा एकच नराधम होता, असं सांगून टाकता. तुमची ही सर्व धडपड कोणाला वाचवण्यासाठी आहे? की ही विकृती आहे? अशा तालिबानी प्रवृत्ती असलेल्या लोकांच्या तुम्ही मुसक्या आवळणार आहेत का? असा सवाल चित्रा वाघ यांनी रश्मी ठाकरे यांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा