InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘कुणी स्वतःला शिवसैनिक म्हणवत असेल तर शिवसैनिकांचे संस्कारही समजून घ्यावे’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत, खुद्द उद्धव ठाकरेंनीच तसं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या रूपाने राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असा शब्दांचा खेळ करणाऱ्या भाजपा नेतृत्वावर खासदार संजय राऊत यांनी तीक्ष्ण शाब्दिक बाण सोडला आहे.

शिवसैनिक रोज खोटं बोलत नाही. तो दिलेल्या शब्दाला जागतो, वचनाला जागतो. सत्तेसाठी, खुर्चीसाठी तो खंजिर खुपसत नाही. प्राण जाए पर वचन न जाए, हा आमच्यावरचा बाळासाहेबांचा संस्कार आहे. त्यामुळे कुणी स्वतःला शिवसैनिक म्हणवत असेल तर त्याने शिवसैनिकांचे संस्कारही समजून घ्यावेत, अशा हल्ला चढवत, संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.