भास्कर जाधवांच्या दमदाटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई : रत्नागिरी येथे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर संताप व्यक्त करत आहेत. भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे, असे नेटकरी त्यांना सुनावत आहेत. मुख्यमंत्र्यांसमोर महिलेवर हात उगारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भास्कर जाधवांना एवढा माज कसला? असा प्रश्न केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणाऱ्या महिलेवर हात उगारून भास्कर जाधवांना काय दाखवुन द्यायचं आहे? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारने अशा मुजोर लोकप्रतिनिधीवर कारवाई करावी, अशी देखील मागणी करण्यात येत आहे. शिवसेनेतून यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. प्रत्येक घडामोडींवर रोखठोक भाष्य करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणात मात्र संयमी प्रतिक्रिया दिली.

भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही फक्त वृत्त पत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे या सगळ्यावर तेच बोलतील, असं म्हणत संजय राऊतांनी या विषयावर जास्त बोलणं टाळलं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि मुख्यमंत्री आणि सरकार हे करतं आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा