काही राजकीय पक्षांना जनतेमध्ये बेस नाही, दहीहंडीवरुन संजय राऊतांची मनसेवर अप्रत्यक्ष टीका

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवावर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्यावरुन मनसे आणि भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.या निर्बंधांमुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. यात ते बोलत होते.

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

यानंतर यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. यादरम्यान केरळला थोडी सूट दिली तर तिथं तिसरी लाट सुरु झाली. महाराष्ट्र सरकार टप्याटप्याने सूट देत आहेत. मात्र काही राजकीय पक्ष आहेत ज्यांना जनतेमध्ये बेस नाही म्हणून ते अशा गोष्टी करत आहेत. त्यांना सरकारने निर्बंधाच्या सूचना दिलेल्या कळत नाहीत, अशी टीका राऊतांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा