काँग्रेसशिवाय सरकार नसल्याच्या नाना पटोलेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन मतांतर असून उघडपणे नाराजी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातही अनेकदा शाब्दिक युद्ध रंगल्याचं पहायला मिळालं आहे. लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत नाना पटोले म्हणाले होते, “आम्ही याआधीही अनेकदा सांगितलं आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितलं आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे.”

नाना पटोलेंच्या या व्यक्तव्याला संजय राऊतांची प्रतिक्रिया दिली, “काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका नाना पटोले यांना का यावी. हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी सुरुवातीपासूनच आमच्या चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धव किंवा अन्य नेते असतील…त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीनं, सहकार्यानेच चाललं आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेलं नाही,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा