आंदोलनावरुन संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका, म्हणतात…

 प्रकाश आंबेडकरांचं मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं की, ‘मंदिर बंद ठेवणं हे कोणी आनंदाने करत नाहीयेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार हे टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी उघड्या करत आहेत. भविष्यात लवकरच मंदिराचा विषय, रेल्वे सुरु करण्याबाबत चर्चा आहे. पण विरोधी पक्षाने सुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी थोडा संयम बाळगला तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील.’

‘आज ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांनी ज्याप्रकारे गर्दी जमवली आहे. ती रेटारेटी सुरु आहे. हे चित्र चांगलं नाही. पंढरपुरच्या विठोबाच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्र आसुसलेला आहे. फक्त बाहेर आंदोलक आहेत ते नाहीत. कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग महत्त्वाचं आहे. हजारो लोकं जमले आहेत ज्यामुळे धोका वाढू शकतो. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू

‘बबड्याची सीरिअल पाहण्याऐवजी…’ ; रोहित पवारांनी शेलारांना सुनावले खडे बोल

‘स्वत: विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच’ प्रकाश आंबेडकर कडाडले

कौतुकास्पद काम ; मुंबईच्या डबेवाल्यांसाठी धावून आले रोहित पवार !

मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा