Sanjay Sawant । “गद्दारांनी बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे”; ठाकरे गटाचा इशारा
Shivsena । Sanjay Sawant । जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन वेगळे गट तयार झालेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून नेहमीच शिंदे गटाला गद्दार म्हणत टीका केलेली आपण पाहतो. ‘खरी शिवसेना कोणाची?’ यावर देखील अनेक वाद झाले आहेत. अशातच आता शिवसेना संपर्कप्रमुख सचिन सावंत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जळगावात आज शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
गद्दारांनी बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे – संजय सावंत (Sanjay Sawant)
शिंदे गटातील नेते हे शिवसेनेला दगाफटका करून गेलेले गद्दार नेते असल्याची टीका संजय सावंत यांनी केली आहे. मूळ शिवसैनिक सेनेसोबतच आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या गद्दारांना धडा शिकवावा, असे आवाहन सावंत यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. “गद्दारांनी हिंमत असेल तर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे”, असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिला.
येणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पेटून उठत कामाला लागण्याचे आवाहनही संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी केले. आपल्याला मिळालेले मशाल चिन्ह घराघरात पोचवावे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा असेल तर तो त्यांनी कसाही वाढवावा, पण आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, खोट्या गुन्ह्यात अडकवले तर गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला. गद्दारांना पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावेत, असे सावंत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, महाविकास आघाडी म्हणून सर्व मित्र पक्षांसोबत लढू, असं म्हणत ज्यांनी शिवसेना फोडायच पाप केलं आहे, अशा सर्वांना मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा संजय सावंत यांनी शिंदे गटासह भाजपला दिला आहे. शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागला तर माझं पालकत्व म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे मुंबईला का असेना लवकरात लवकर त्याच्यासाठी धावून येईल, असंही संजय सावंत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Rain Update | राज्यात मुंबईसह ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता
- Ajit Pawar | अजित पवार अडचणीत येणार! ‘या’ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून होणार चौकशी
- Sachin Sawant | “राज ठाकरेंना महाराज कळले असते तर…”; काँग्रेसचा राज ठाकरेंना टोला
- Gulabrao Patil | “अन्याय होत असेल तर…”, गुलाबराव पाटलांचा एकनाथ खडसेंवर पलटवार
- Arvind Sawant | “इतका छळवाद झाला तेव्हा राज ठाकरे गप्प होते, आता…”; उद्धव ठाकरे गटाचा राज ठाकरेंवर हल्ला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.