Sanjay Shirsat | अजित पवारांना प्रमुख करणं हे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना परवडणार नाही – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: मला विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा, असं वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं होत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar is a real contender for the post of Chief Minister in NCP – Sanjay Shirsat

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “अजित पवार हे राष्ट्रवादीतील खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. तो नेता आज विधान सभा विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी विनवण्या करत आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पद सोडण्याची मागणी करताचं सभागृहातील सर्व नेत्यांनी मनापासून टाळ्या वाजवल्या होत्या.”

पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “अजित दादांच्या विरोधात काम करणं ही पक्षातील नेत्यांची भूमिका आहे. अजित पवारांना प्रमुख करणं हे राष्ट्रवादी पदाच्या नेत्यांना परवडणार नाही. म्हणून ते त्यांना सतत डावरतं असतात.”

दरम्यान, संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या प्रतिक्रियेवर अजित पवार काय उत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3qX1Ec3